गड किल्ले
गड किल्ले
महाराष्ट्र म्हणजे किल्ल्यांचा देश. श्री. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच रयतेचा राजा महाराष्ट्रातील तमाम जनतेचे दैवत आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये गड- किल्ल्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्रात श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचे एकूण ३६५ किल्ले आहेत. त्यात १३ सागरी किल्ले आहेत. राज्यातील असंख्य किल्ले आपल्या कर्तृत्वाची साक्ष देतात. त्यामुळे या किल्ल्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्रातील सर्व किल्ले महाराष्ट्र देशाची शान आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ल्यांच्या डेांगरमाथ्यांवर पाण्याची झरे आहेत.
वसईचा किल्ला

वसईचा किल्ला
वसईचा किल्ला हा महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील वसईजवळ असणारा एक भुईकोट किल्ला असून तो समुद्रकिनाऱ्यालगत बांधलेला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे
जंजिरा

जंजिरा
रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. याचे खरे नाव जजीरे मेहरुब असे असून, जंजीरा म्हणजे पाण्यानी वेढलेले बेट व मेहरुब म्हणजे चंद्रकोर. चारी बाजूंनी अरबी समुद्रने घेरलेला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे.
विजयदुर्ग

विजयदुर्ग
विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अभेद्य असा जलदुर्ग आहे. उत्कृष्ट वास्तुकलेचा नमूना असणारा हा दुर्ग आजही सुस्थितीत उभा आहे. अजिंक्य दुर्ग असणारा विजयदुर्ग पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणूनही ओळखला जात असे.
सुवर्णदुर्ग

सुवर्णदुर्ग
हर्णे बंदर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. सुवर्णदुर्ग या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झालेले आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णेच्या सागरी किनाऱ्यावर तीन किनारी किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली आहे.
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. नोव्हेंबर २५, इ.स. १६६४ रोजी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली.
काळदुर्ग किल्ला

काळदुर्ग किल्ला
कालदुर्गला पारंपारिक अर्थाने किल्ला म्हणता येणार नाही. तो किल्ला असण्याची चिन्हे दिसत नाहीत. हे प्रदेश (तेहलानी) निरीक्षण आणि लक्ष ठेवण्यासाठी एक स्थान असू शकते. गडाचा माथा फक्त एक मोठा आयताकृती खडक आहे. या खडकामुळे किल्ला दूरवरून शोधणे अगदी सोपे आहे
पूर्णगड किल्ला

पूर्णगड किल्ला
पूर्णगड हा मुचकुंडी नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर वसलेला एक छोटासा किल्ला आहे. कान्होजी आंग्रेस नौदलातील हा एक महत्त्वाचा किल्ला होता. पूर्णगड किल्ला कान्होजी आंग्रे यांनी १७२४ मध्ये बांधला. किल्ला मध्यम स्वरूपाचा आहे.